भारतीय लोक न्याय पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी दिलीप बंदीचोडे यांची नियुक्ती..
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रीय असलेल्या भारतीय लोक न्याय पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी दिलीप बंदीचोडे यांची नियुक्ती करत असल्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र सक्सेना यांनी त्यांना दिले आहे.
पनवेलसह नवी मुंबई परिसरात राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे दिलीप बंदीचोडे यांनी आतापर्यंत सामाजिक व राजकीय केलेल्या कामाची दखल घेवून राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्रकुमार सक्सेना यांनी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी केली असून त्याप्रकारचे नियुक्तीपत्र त्यांना दिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तरुण वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

Comments