पनवेल / वार्ताहर : - मानवी जिवीतास हानीकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला विमल पानमसाला व तंबाखु
(सुगंधीत) एक देशी बनावटीचे पिस्तुल , वाहने , रोख रक्कम असा सुमारे ७९ लाख रूपये किमंतीचा मुद्देमालासह पाच आरोपी जेरबंद करण्याची कारवाई गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी केली आहे.
मा. अपर पोलीस आयुक्त, यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे प्राप्त गोपनीय अनुषंगाने दिनांक १७ / ० ९ / २०२१ रोजी गुन्हे शाखेचे वपोनि कोल्हटकर यांना मिळालेल्या बातमीवरून,सेक्टर ३० ए ,ओरीसा भवन , वाशी नवी मुंबई परिसरात करण व त्याचे साथीदार हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पानमसाला व तंबाखु ( सुगंधीत ) मालाची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणुन तेथे दुसऱ्या वाहनां मधून वितरीत करणार आहेत . बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांचे सुचने प्रमाणे दिनांक १७ / ० ९ / २०२१ रोजी पहाटेचे सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एन.बी.कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली,ओरीसा भवन समोरील निर्जन रोडवर एका आयशर टेम्पो मथुन बोलेरो पिकअप जिपमध्ये काही इसम गोण्यामधे असलेला विमल पानमसाला व वी -१ सुगंधीत तंबाखू भरत असतांना पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेण्यासाठी घेराव घातला असता तेथील इसमांनी पोलीसांशी झटापट केली तसेच एक इसम पळुन जात असतांना शिताफिने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यादरम्यान तेथील पोलीसांचे अभिलेखावरील सराईत आरोपी करण राम साळुके याने त्यावेकडील अग्निशस्त्र पोलीसांवर रोखुन धाक दाखवुन जिवेठार मारण्यचा प्रयत्न करत , कायदेशिर कारवाईस अडथळा निर्माण करुन सदर ठिकाणाहुन अंधार व गोंधळाचा फायदा घेवुन पळुन गेला . सदर ठिकाणाहुन कारवाई दरम्यान आयशर टेम्पो , बोलेरो पिकअप जिप , फॉच्युनर कार या वाहनांमध्ये २७,९३,८८० / - रू . किंमतीचा मानवी जिवीतास हानीकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला वेगवेगळया प्रकाराचा पानमसाला व तंबाखु
(सुगंधीत) असा मालाचा साठा व त्यासाठी वापरण्यात आलेली वाहने, फॉरच्युनर कारमध्ये मिळुन आलेली रोख रक्कम, एक देशी बनावटीचे पिस्तुल,मोबाईल फोन व इतर सुमारे
७९,००,८८०/-रू.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन याबाबत वाशी पोलीस ठाणे गु.र.नं. ३२३/२०२१ भा.द.वि. कलम ३०७ , ३५३ , १८८ , २७२ , २७३ , ३२८ , ३४ सह अन्नसुरक्षा कायदा कलम २६ ( २ ) ( 1 ) , २६ ( २ ) ( iv ) , २७ ( ३ ) ( D ) , २७ ( ३ ) ( E ) भारतीय हत्यार कायदा कलम ३ , २५ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) , ( ३ ) / १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रस्तुत गुन्हयात ५ आरोपींना दि.१८/०९/२०२१ रोजी १.३४ वा . अटक करण्यात आली असुन दि.२३/०९/२०२१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी देण्यात आली आहे, अटक आरोपींची नावे : 9 . अजयकुमार सुरज गौंड , वय ३३ वर्षे धंदा ड्रायव्हर , रा . फळ मार्केट , सेक्टर १ ९ , वाशी , नवी मुंबई , मुळ राहणार , सलाहाबाद , सरकारी आवास , ता.जि. महु , राज्य उत्तरप्रदेश २ . गोविंद वामन बोडारे , वय ४४ वर्षे , धंदा ड्रायव्हर , मु.पो. ओझर मिग , ता . ओझर , जि . नाशिक ३ . घेवाराम कान्हाराम देवाशी , वय ३१ वर्षे , धंदा किराणादुकान , राह . धनअळी अपार्टमेंट , शॉपनंबर १ , लक्ष किराणा स्टोअर , सेक्टर ३६ , करावेगाव , नवी मुंबई 8 . अक्षय मुरली गायकवाड , वय २१ वर्षे , धंदा हमाली , राह . मानखुर्द , महाराष्ट्र नगर , गणेश मैदानाजवळ , शिवाजीनगर , मुंबई , मु.पो. गवर , ता . बसव कल्याण , जि . बिदर , राज्य कर्नाटक ५ . राहुलकुमार मुन्नाप्रसाद कुमार , वय २६ वर्षे , धंदाहमाली , राह . लंगडपुर , पो . महाराजगंज , ता . जि . गाजीपुर , राज्य उत्तरप्रदेश
पाहिजे आरोपी : -करण राम सालुंके , वय २७ वर्षे रा - प्लॅटनं . ४०४ , मंगल मुर्ती बिल्डींग , जुहुगांव , वाशी , नवी मुंबई . त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) तुर्भे एम.आय.डी.सी. पो.स्टे . गु.र.नं. १२/२०१८ भा.द.वि.क. ३ ९ ४,३४ प्रमाणे २ ) एन.आर.आय. पो.स्टे . गु.र.नं. १६५/२०२१ भादवि कलम १८८,२७२,२७३ , ३२८ सह अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६.२७ या गुन्हयात पाहिजे आरोपी आहे . अटक आरोपी क . ३ घेवाराम कान्हाराम देवाशी याचे विरुध्द एन.आर.आय. पो.स्टे . गु.र.नं. १६५/२०२१ भादविसंक १८८,२७२,२७३ , ३२८ सह अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६,२७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन या गुन्हयात पाहिजे आरोपी आहे . आरोपीतांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पानमसाला व तंबाखु ( सुगंधीत ) , अग्निशस्त्र ह बेकायदेशिररित्या कोठुन आणला व तो कोठे विक्री करणार होते . या अवैध व्यवसायामध्ये आंतरराज्य टोळीसकिय असुन त्या अनुषंगाने इतर साथीदारांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत अधिक तपास सुरु आहे . मा . पोलीस आयुक्त , श्री . बिपिनकुमार सिंग , अपर पोलीस आयुक्त , श्री . महेश घुर्ये , नवी मुंबई यांनी सुरू केलेल्या “ नशा मुक्त नवी मुंबई ' अभियान अंतर्गत पोलीस उप आयुक्त , श्री . प्रविणकुमार पाटील , सहायक पोलीस आयुक्त , श्री . विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , नवी मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन . बी . कोल्हटकर , पोउपनि नितीन मुदगुन , धनराज केदार , शेखर तायडे , पोलीस अमंलदार ज्ञानेश्वर सांगळे , उत्तम तरकशे , हनुमंत दळवी , सतीश भोसले , पोपट जगदाळे , महेंद्र म्हात्रे , भास्कर कुंभार , राजेश सोनावणे , संदिप कोळी , विकास म्हसकर , उदय म्हात्रे , आर.कोडी , सुभे , पवार , एस.पी.फुलकर , रविद्र सानप यांनी उल्लेखनीय कामगीरी केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास व.पो.नि.एन.बी. कोल्हटकर हे करीत आहेत .