शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र १९ तर्फे दगडी शाळा येथे मोफत छत्री वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...
शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र १९ तर्फे दगडी शाळा येथे मोफत छत्री वाटप व वृक्षारोपण...

शिवसैनिक राहुल केशव गोगटे यांचा पुढाकार ...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र १९ च्या वतीने पनवेल महानगरपालिका शाळा क्र २ दगडी शाळा येथे शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले तसेच या निमित्ताने  शाळेत वृक्षारोपण देखील करण्यात आले. 
याप्रसंगी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उक्ती नुसार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण तसेच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनुसार आम्ही राजकीय क्षेत्रात नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असून त्याचाच हा एक भाग आहे. त्यानुसार शिवसैनिक राहुल गोगटे यांच्या प्रयत्नातून शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शाळेत वृक्षारोपण करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा सल्लागार – रमेश गुडेकर, जिल्हाप्रमुख - रामदास शेवाळे , महानगरप्रमुख - प्रथमेश सोमण, उपजिल्हाप्रमुख - परेश पाटील, उपमहानगर प्रमुख – महेश सावंत, शहरप्रमुख - प्रसाद सोनावणे ,उपशहरप्रमुख - शैलेश जगनाडे, सुजन मुसलोंडकर,विक्रम पाटणकर, मंदार काणे,आदी शिवसैनिक उपस्थित होते, तसेच पनवेल दगडी शाळेचे मुख्याध्यापक सुजित म्हात्रे, शिक्षक कमल तायडे ,वैभव पाटील,वैशाली सावळे, अर्चना माने, स्वाती पाटील यांनी शिवसेनेच्या या उपक्रमाबाबत आभार मानले.
सदर छत्री वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम शिवसैनिक राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image