महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहराध्यक्ष पदी संजय मिरकुटे यांची नियुक्ती

पनवेल वैभव :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहराध्यक्षपदी संजय मिरकुटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने व नितीन सरदेसाई यांच्या सहकार्याने नियुक्ती करण्यात आली .यावेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, रायगड जिल्हासंघटक केसरीनाथ पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याअगोदर मनसेच्या पनवेल व नविन पनवेल शहराध्यक्षपदी यतीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती पण पक्षांतर्गत वादामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची मनसैनिकांन मध्ये उत्सुकता होती. त्याचाच प्रत्यय म्हणून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले व आत्ताचे कट्टर मनसैनिक संजय मिरकुटे यांची राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने पनवेल शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, तसे पत्र त्यांना कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

संजय मिरकुटे यांचा नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय कामामध्ये लोकहितासाठी तळमळीने सहभाग असलेले व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचत आहेतच त्याचप्रमाणे लोकांच्या हाकेला धावणारे,कार्यक्षम , असे नेतृत्व पनवेलकरांना लाभल्यामुळे मनसैनिकांत व नागरिकांत आनंदाचे वातावरण पनवेल शहरात निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Comments