राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद...
पनवेल, दि. २४ (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीमधील राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळ आणि एनएसएस ग्रुप विद्यार्थी व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर उपक्रमाला तरुणांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी परिसरातील तरुणांनी या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान केले. अशा रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र शिवसेना उप शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर, सामाजिक कार्यकर्त्या विजया कदम, मंडळाचे अध्यक्ष विशाल गावंड व इतर पदाधिकार्‍यांच्या हस्ते देण्यात आले. या सामाजिक बांधिलकी उपक्रमाबद्दल मंडळाचे व आयोजकांचे सर्वच स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

Comments