शेकापचे बेलवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच व उपसरपंच यांच्यासह अनेकांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
पनवेल / प्रतिनिधी : - शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होवून शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म  मंत्री तसेच संपर्क नेते कोंकण विभाग सुभाषजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचे बेलवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच नरेश पाटील, माजी उपसरपंच वारदोली अरुण पाटील यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य बेलवली महेंद्र म्हात्रे, विनायक पाटील, सुनाद पाटील, दिनेश ढोपरे, दत्ता पाटील, रोहित पाटील, आतिष मोकल, प्रथमेश ढोपरे व वार्दोली ग्रामपंचायत सदस्य चे रविंद्र शेळके यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

याप्रसंगी सुभाष देसाई यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून  शिवसेना पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, विभाग प्रमुख नंदू घरत आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments