पनवेल / प्रतिनिधी : - ग्रामपंचायत पालीदेवद हद्दीतील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे यांच्यामार्फत मोफत लसीकरन करण्यात येत आहे. तरी ज्या नागरिकांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी लक्ष्मी पब्लिक स्कूल, सुकापूर येथे लसीकरण केंद्रावर हजर रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
१८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी COVISHIELD ह्या लसीचा पहिला डोस आणि पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरा डोस लक्ष्मी पब्लिक स्कूल, सुकापूर या केंद्रावर उपलब्ध होईल. लसीकरणाची वेळ सकाळी१० वाजलेपासून सुरू होत आहे. नागरिकांनी लसीकरण करण्याचे आवाहन योगिता राजेश पाटील (सरपंच), अशोक पाटील(उपसरपंच),
नंदकिशोर भगत(ग्रामविकास अधिकारी), अमित जाधव (जिल्हा परिषद सदस्य), राजेश पाटील, महेश पाटील यानी केले आहे.