रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने "चालक दिन" साजरा
                               
पनवेल / प्रतिनिधी  :  -   देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील वाहन चालक एक महत्वाचा घटक असून त्यांची अनन्यसाधारण भूमिका आहे. देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा उचित सन्मान करण्याच्या दृष्टीने १७ सप्टेंबर  हा "चालक दिन" म्हणून शासनाने घोषित केला आहे.
 
अभय देशपांडे प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल, अनिल पाटील . उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ,  गजानन ठोंबरे , सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी व रोटरीचे माजी प्रांतपाल DRFC डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल मध्ये १७ सप्टेंबर हा दिवस चालक दिन  साजरा करण्याचे ठरले. त्या प्रमाणे आज पनवेल मध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये "चालक दिन" साजरा करण्यात आला. 
यावेळी एस टी महामंडळाच्या चालकांचा, रुग्णवाहिका चालकांचा, अग्निशमन दलाचे चालकांचा, ऑटोरिक्षा चालकांचा करोना पॅनडेमिक काळात केलेल्या कार्या बद्दल कृतज्ञता पूर्वक सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप कोतकर , उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन सकपाळ , एस टी महामंडळाच्या पनवेल आगराचे व्यवस्थापक  विलास गावडे , पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत आदी मान्यवरांसह रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.अभय गुरसाळे, सचिव संतोष घोडींदे, संचालक सुदीप गायकवाड, प्रोजेक्ट प्रमुख विवेक खाडये, खजिनदार शैलेश पोटे, क्लबचे माजी अध्यक्ष  डॉ हितेन शाह, शिरीष वारांगे, बी जी पाटील, ऋषी बुवा, नितेश सूनका, सायली व श्रीकांत सातवळेकर व रोटरी सदस्य सहभागी झाले होते.
Comments