दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये सोन्यासह रोख रक्कम लंपास...
दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये सोन्यासह रोख रक्कम लंपास...

पनवेल, दि.4 (संजय कदम) ः तळोजा परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे.
सौ.गुलाब पाटील (50 रा.हनुमान मंदिरासमोर, पाचनंद) यांच्या घरातील प्लॅस्टीकच्या डब्यामध्ये ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे 4 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरुन नेले आहेत. तर दुसर्‍या घटनेत अखिलेश द्विवेदी (45 रा.सनराईज अपार्टमेंट, तळोजा फेज 1) यांच्या राहत्या घराचे दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी कशाच्या तरी सहाय्याने उघडून आत प्रवेश करून कपाटातील ड्रॉव्हरमध्ये असलेल्या पाकीटातील 15 हजार रुपये रोख रक्कम पॉकिटासह चोरुन नेली आहे. या दोन्ही घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments