" मधुमेहाचा पराभव" या रोटरीच्या मोहीमेचे जागतिक स्तरावर आयोजन...

 पनवेल वैभव : रोटरी इंडियाच्या माध्यमातून बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी भारतात अनेक ठिकाणी मधुमेह तपासणी करुन भारतातील वाढत्या मधुमेह रुग्णांचा शोध घेऊन त्यांना पुढील उपचार घेण्यासाठी उद्युक्त करण्याच्या उद्देशाने _"मधुमेहाचा पराभव"_ या मोहीमेचे जागतिक स्तरावर आयोजन करण्यात आले होते. 
भारतातील अनेक रोटरी क्लबने या मोहिमेचे यशस्वी आयोजन केले होते.
या मोहिमेचे प्रायोजक दि आर्ट ऑफ लिविंग, टोरेंट फार्मा,  बिट ओ स्मार्ट डायबिटीज मॅनेजमेंट, रिसर्च सोसायटी फॉर दि स्टडी ऑफ डायबबिटीस इन इंडिया आणि रोटरी इंटरनॅशनल हे होते. या मोहिमेचे अधिकृत पणे एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् साठी नोंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले.
पनवेल मधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज या क्लबने एकूण पाच ठिकाणी आयोजन केले होते,
अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलोनी, डॉ. राजीव बुधकर यांचे क्लिनिक, कामगार राज्य विमा योजना(इ. इस. आय. सी.) करंजाडे येथील क्लिनिक, नील अशिमा सोसायटी करंजाडे आणि मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग बँक ग्रांट रोड येथे या शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण ४०० पेक्षा जास्त लोकांनी मधुमेहाची तपासणी करुन घेतली.
या संपूर्ण मोहिमेअंतर्गत रोटरी इंटरनॅशनल यांनी एका दिवसात १० लाख लोकांच्या चाचण्या करण्याचे लक्ष ठेवले होते.
Comments