पनवेल वैभव वृत्तसेवा : - शिपिंग क्षेत्रात सातत्याने प्रशासकीय पातळीवर अगदी केंद्रापासून ते राज्य सरकारपर्यत पाठपुरावा करणारे ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय वासुदेव पवार आणि कार्याध्यक्ष श्री अभिजीत दिलीप सांगळे यांचा उदयपूर, राजस्थान मध्ये त्यांच्या उल्लेखनीय कार्याबाबत सत्कार करण्यात आला.
MV मरीन हे जहाज सायप्रस येथे काही महिन्यांपासून अडकले होते व त्या सोबत तिथे असणारा भारतीय सिफेरर्स देखील अडकून पडले होते. भारतीय सिफेरर्सच्या कुटुंबीयांनी ऑल इंडिया सिफेरर्स युनियन अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांच्याकडे मदत मागितलीवर त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली. यूनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी शिप च्या मालकाशी संवाद साधून तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी पत्र व्यवहार करून ११ भारतीय नाविक आपल्या अथक प्रयत्नाने मायदेशी आणले. या समयी शिपिंग क्षेत्रात कार्यरत असलेले कॅप्टन संजय पराशर यांनी देखील परराष्ट्र मंत्री यांन कडे भारतीय सिफेरर्स सुखरूप येण्याची मागणी केली. युनियनच्या कार्याची दखल घेत सिफेरर्सच्या कुटूंबियांनी राजस्थानातील उदयपुर येथे विशेष सत्कार समरंभ आयोजित करून संजयजी व अभिजीतजी यांचा सत्कार केला. या वेळी उदयपूरचे भाजप खासदार श्री.अर्जूनसिंह मिनाजी यांचेकडून संजय पवार व अभिजीत सांगळे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले व युनियनचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचविण्याचे आश्वासनही खासदार मिनाजी यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तम करण्यात आले होते आणि त्या आदरातिथ्या बद्दल संजय जी आणि अभिजीत जी यांनी कृज्ञता व्यक्त केली. विशेष आभार सौ. श्वेता राठोड व संजीव सिंग