मा. उपमहापौर नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त श्रीं च्या घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन

पनवेल दि. ०३ (संजय कदम)- पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी खास गणेशोत्सवानिमित्त श्रीं च्या घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन सालाबादप्रमाणे यंदाही केले आहे.
       प्रभाग क्र.-18 मधील नागरिकांसाठी त्यांनी या आरास स्पर्धेचे आयोजन केले असून त्यासाठी प्रथम पारितोषिक 3 हजार रोख, द्वितीय पारितोषिक 2 हजार रोख, तृतीय पारितोषिक 1 हजार रोख व उत्तेजनार्थ पारितोषिक 500 रू. रोख असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9167042666 येथे संपर्क साधावा.
       
Comments