नवीन पनवेल भागातून विदेशी सिगारेटचा व गुटख्याचा साठा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई


 पनवेल: नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन पनवेल भागातील एका पान शॉपवर तसेच एका घरावर छापा मारुन सुमारे 2 लाख 33 हजार रुपये किंमतीचा परदेशी सिगारेटचा साठा तसेच गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तसेच या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले आहे.  
नवीन पनवेल सेक्टर-11 मधील आदई सर्कल येथील विनम्र पान शाँपमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे विदेशी कंपनीचे सिगारेटचा तसेच गुटख्याचा साठा करुन त्यांची सर्रास विक्री करण्यात येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यामुळे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद यांनी सदर पान शॉपवर कारवाई करण्याचे सुचित केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास आदई सर्कल येथील विनम्र पान शाँपवर छापा मारुन सदर पान शॉपची तपासणी केली. या कारवाईत सदर पान शॉपमध्ये वेगवेगळे विदेशी सिगारेटचे पाकिटे व आर एम डी गुटखा व सुगंधी तंबाखुचा साठा करुन ठेवण्यात आल्याचे आढळुन आले. तसेच सदर सिगारेटच्या पाकिटावर शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे वैधानिक चित्र व वैधानिक इशारा लिहिले नसल्याचे आढळुन आले.  
त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर पान शॉप मधून 23,880 किंमतीचा पानमसाला, सुगंधीत तंबाखु व विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर पान शॉपचा मालक आदित्य सविता याच्याकडे सदरचा माल कुठुन आणला तसेच या मालाचा साठा इतर कुठे ठेवण्यात आला आहे? याबाबत विचारपुस केली असता, सदरचा माल नवीन पनवेल सेक्टर-6 येथे रहाणारा त्याचा भाऊ प्रदयुमन कैलानाथ सविता व त्याचा मित्र सुनिलकुमार गिरधारीलाल विश्वकर्मा हे दोघे आणत असल्याचे व त्यांनीच सदरचा माल त्याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन पनवेल सेक्टर-6 मधील रोहाऊसवर छापा मारुन सदर घराची तपासणी केली केली. या तपासणीत सदर घरातील बेडरुममध्ये वेगवेगळे परदेशी सिगारेटचे पाकीटे व गुटख्याचा साठा करुन ठेवण्यात आल्याचे आढळुन आले.  
तसेच सदर सिगारेटच्या पाकिटावर शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे योग्य आकाराचे वैधानिक चित्र व वैधानिक इशारा लिहीलेला नसल्याचे देखील आढळुन आले. त्यानंतर सदर घरातून 1,01,300 रुपये किंमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा तसेच 1,08,000 रुपये किंमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला. सदरचा माल त्यांनी कुठून आणला याबाबत पोलीस पथकाने त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुनिलकुमार विश्वकर्मा, प्रदयुमन सविता व आदित्य सविता या तिघा विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image