तळोजा मेट्रो स्टेशनला सद्गुरू वामनबाबा महाराज यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी

पनवेल दि.02 (वार्ताहर): तळोजा मेट्रो स्टेशनला सदगुरू वामनबाबा महाराज यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी सिडकोकडे केली आहे.
         याबाबत सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांची शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी भेट घेऊन तळोजा मजकूर मठात सद्गुरू वामनबाबा महाराज यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्यामुळे रायगड आणि ठाणे परिसरात वारकरी संप्रदाय वाढविण्याचे फार मोलाचे काम केलेले आहे. रायगड आणि ठाणे जिल्हयाचे तळोजा मजकूर हे वारकरी संप्रदायाचे एक शक्तिपीठ बनले आहे. त्यांनी समाज प्रबोधनाला फार मोठे योगदान दिलेले आहे. यापूर्वीही या भागातील ग्रामस्थांनी सिडकोकडे निवेदन दिले आहे. लवकरच मेट्रो काही महिन्यांत सुरू होते असे समजले आहे. तरी तळोजा मेट्रो स्टेशनला सदगुरू वामनबाबा महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
        


फोटोः शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांना निवेदन देताना
Comments