लायन्स क्लबच्या रिजन चेअरपर्सन पदावर ज्योती देशमाने यांची नियुक्ती

पनवेल दि.06 (वार्ताहर)- सदैव समाज सेवेसाठी तत्पर असलेल्या सौ.ज्योती देशमाने यांची नुकतीच लायन्स क्लबच्या रिजन चेअरपर्सन या पदावर नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्या दिवसापासून त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरु केला आहे.
            रिजन दोन ची झोन अॅडव्हायझरी तसेच रिजन मीट हाॅटेल पायल येथे पार पडली. भरलेले सभागृह रिजन २ मधील पनवेल मधील ७ तसेच उरण, खोपोली, सीबीडी, वाशी,उलवे, कामोठे, खारघर, खारघर कोपरा, चॅम्पियन,एकूण १६ क्लब अधिकाऱ्यांनी भरलेल्या सभागृहात उत्साह वाढविला. यात तीनही झोन चेअरमन अनुक्रमे झोन एक चे झोन चेअरमन लायन वाय पी सिंग ,झोन दोन च्या झोन चेअरपर्सन ला.रीना अग्रवाल, झोन तीन चे झोन चेअरमन ला.उदय साखरे, प्रांतपाल लायन एल.जे.तावरी, माजी प्रांतपाल सुभाष भलवाल,डीस्टीक्ट मधील लायन्सचे सर्व पदाधिकारी चेतन मेहता,मुर्ती,जयेश शहा,नयन कवळे,मनिष लाडगे,भरत दत्त अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सगळ्या त महत्वाचे म्हणजे त्यांच्या प्रत्येक वाटचालीत सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे त्यांचे पती लायन नागेश देशमाने आणी दोनही मुल अक्षय आनंद यांच्या सहकार्याने पहिली रिजन स्टाफ मीट यशस्वी पणे संपन्न झाली. या कार्यक्रमात प्रांतपाल लायन एल जे तावरी यांनी मेडल, तसेच इंटरनॅशनल अध्यक्षांच सर्टिफिकेट देऊन रिजन चेअरमन लायन सौ.ज्योती नागेश देशमाने.यांचा सन्मान केला व त्यांनी केलेल्या अतिउत्तम कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील कारकीर्दी साठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात महाड पूरग्रस्तांना मदतीसाठी रीजन दोन मधील सर्व संस्थांनी भरपूर मदत केली पनवेल क्लबच्या पुढाकारांनी महाड जवळील बिरवाडी येथे ८ दिवस किचन सुरु केले होते.त्याकरीता रिजन चेअरपर्सन लायन सौ.ज्योती देशमाने यांनी सर्टिफिकेट देऊन सगळ्या क्लब पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पनवेल चे सभासद माजी अध्यक्ष लायन संजय पोतदार यांना डाॅक्टरेट मिळाली आहे.त्याकरीता प्रांतपाल लायन एल जे तावरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image