राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक व पनवेल सह इतर अधिकारी वर्गाच्या झाल्या बदल्या...
पनवेल दि.१३ (संजय कदम)- राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पनवेल याच्या सह पनवेल शहर व पनवेल ग्रामीण येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून रिक्त झालेल्या जागेवर कोणते अधिकारी येऊन बसतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
      राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पनवेल चे निरीक्षक एस.एस. गोगावले यांची बदली राज्य उत्पादन शुल्क ई विभाग ठाणे येथे निरीक्षक पदी झाली आहे. तर याच विभागात पनवेल येथे दुय्यम निरीक्षक म्हणून काम करणारे एस.एस. गायकवाड यांची राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहर -१ येथे दुय्यम निरीक्षक म्हणून झाली आहे. पनवेल शहर-१ चे निरीक्षक रणपिसे यांची बदली मुंबई येथे झाली असून त्यांची जागा सध्या रिक्त आहे. तसेच दुय्यम निरीक्षक जितेंद्र माजगावकर यांची औरंगाबाद येथे तर गोविंद पाटील यांची ठाणे येथे बदली झाली आहे. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण चे निरीक्षक चव्हाण हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने या रिक्त झालेल्या जागांवर कोणकोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
      

फोटो- एस.एस. गोगावले
Comments