तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्यावतीने महापालिकेच्या डॉक्टरर्सचा सत्कार....


पनवेल,दि.१६ : तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्यावतीने १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पनवेल महापालिकेच्या डॉक्टरर्स व परिचारिकेंचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. 

कोविड१९ च्या महामारीमध्ये पनवेल महापालिकेच्या वैद्यकिय पथकातील डॉक्टरर्स व परिचारिकांनी कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असताना देखील स्वत:चा जीव धोक्यात घालून आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार आणि वैद्यकिय आरोग्याचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा मध्यवर्ती कारागृहातील  कैद्यांकरीता ॲन्टीजन व आरटीपीसीआर तपासणीचे वेळोवेळी आयोजन केल्याने, कारागृहातील कैद्यांमध्ये तसेच करागृह कर्मचाऱ्यांमध्ये कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला नाही. आत्ता पर्यंत कारागृहामध्ये जवळपास साडेपाच हजार कैद्यांची ॲन्टीजन व आरटीपीसीआर टेस्ट्स करण्यात आल्या आहेत.

तसेच अल्प प्रमाणात कोविड१९ चा प्रादुर्भाव झालेल्या कैद्यांवर पालिकेच्या डॉक्टरर्संनी वेळीच उपचार करून प्रसार रोखण्यास मदत केली. याच बरोबर कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्यावतीने कारागृहामध्ये  विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेने केलेल्या सहकार्याबद्दल तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे जेष्ठ अधिक्षक कौस्तुभ कूर्लेकर, अतिरिक्त अधिक्षक दत्तात्रय गावडे, वरिष्ठ तुरूंग अधिकारी नागेश पाटिल यांच्या हस्ते डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, डॉ. रोमा म्हसकर, डॉ. महेश महाजन, डॉ.शुभम पाटील तसेच महापालिकेच्या अधिपरिचारिका यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
Comments