साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी....

अण्णा भाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून स्टेचर चे लोकार्पण करण्यात आले

पनवेल / प्रतिनिधी :- दि.१ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ वी जयंती पंचशील नगर सामाजिक संस्था नवीन पनवेल ने पंचशील नगर येथे साजरी केली. 
या वेळी संस्थेच्या पदाधिकारी नागरीक मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात नामफलकाला व महापुरुषाच्या फोटोला पुष्पहार श्रीफळ वाढवून वंदन करण्यात आले या कार्यक्रमाला वकील राम चव्हाण, एम बी घाटे आदी मान्यवर उपस्थित संतोष ढोबळे  चहा पान व्यवस्था केली व गोपाळ उभाळे करण बोरुडे या तरुणांनी खीरदान कार्यक्रम केला तसेच पंचशील बुद्ध विहारात सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठेच्या फोटो पूजन करून नागरिकांनी अभिवादन करण्यात आले  दुपारी शिवसेनेचे शाखाप्रमुख कुंडलिक माघाडे कडून गरजू मुलांना वह्या वाटप करण्यात आले.

तसेच  पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थे मार्फत सायंकाळी ७ वाजता मान्यवरांचे विचार व्याख्यान कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला समाजसेवक रमेश तुपे, प्राध्यापक सचिन आवळे,निवाराप्रमुख डी डी गायकवाड श्री मनोज ठाकूर संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांच्या उपस्थितीत सर्व महापुरुषाच्या व आण्णा भाऊ साठे च्या फोटोस अभिवादन करून स्टेचार चे लोकार्पण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच पंचशील नगर रहिवाशी संस्थेला अन्नदानाच्या कार्यास व सामाजिक उपक्रमास मदत करणाऱ्या नागरिकांचे आभार व स्वागत करण्यात आले यावेळी अन्नदाते शेकाप युवा नेते सुनील वानखेडे मनोज ठाकूर अमोल परदेशी जुम्मंन खान याचे  आभार व स्वागत करण्यात आले. तसेच  सचिन आवळे सरांनी उपस्थित मुलांना नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व समजून दिले त्याला प्रोत्साहन म्हणून रमेश तुपेनी गरजू ५ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.डी डी गायकवाड यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले असून संस्थेच्या आता पर्यंत च्या कामाचे कौतुक केले. स्वागत समारंभानंतर लहान मुलांना संस्कृती कार्यक्रम गायन नृत्य कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, सचिव राहुल पोपळवार,सह सचिव विनोद खंडागळे खजिनदार भानुदास वाघमारे, अजय दुबे, आदींनी मेहनत घेतली व संतोष ढोबळे संतोष जाधव संजय धोत्रे हेमा रोड्रिंक्स शोभा गवई रामदास खरात आदी चे सहकार्य लाभले आमन तायडे अविनाश पराड उमेश पलमाटे आदींनी मेहनत घेऊन कार्यक्रम पार पडला
Comments