एक हात मदतीचा अंतर्गत 'शिवसहाय्य' पनवेल तर्फे चिपळूण तालुक्यातील पुरग्रस्थानां मदतीचा हात...
'संकट गंभीर, शिवसहाय्य पनवेल खंबीर'

पनवेल वैभव / प्रतिनिधी :- शिवसहाय्य, पनवेल या समाजसेवेतील अग्रणी, पुरस्कारप्राप्त व लोकप्रिय संस्थेतर्फे दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी, 'एक हात मदतीचा' अंतर्गत पूरग्रस्त चिपळूण तालुक्यातील 'खेर्डी' आणि 'कळंबस्ते' या पूरग्रस्त गावांत प्रत्यक्ष जावून मदतीचे कर्तव्य बजावण्यात आले. 
एकूण २३० किट वितरितकरण्यातआले. प्रत्येक किट मध्ये खाण्याच्या वस्तू (रेडी to ईट), पाण्याच्या बाटल्या, स्वछता करण्यास आवश्यक गोष्टी व औषधे व चादरी सहित किमान 14 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.

आपल्या सामाजिक जाणिवा शाबूत ठेवून केलेल्या या समाज सेवेबद्दल श्री. संजय सोमण, श्री. भुवड, श्री. विजय शिर्के, अविनाश व इतर ग्रामस्थांनी, शिवसहाय्य, पनवेलचे विशेष आभार मानले.
यासाठी  प्रविण जाधव, सतीश कळमकर, संकेत बुटाला, डॉ.गौरव दवे, राकेश टेमघरे, अॅड. अमर पटवर्धन, सनी टेमघरे, साईसूरज पवार, प्रसाद पटवर्धन, चेतन शेळके, अमेय ठाकरे व प्रथम ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी शिवसहाय्य, पनवेल संस्थेने आपल्या सर्व देणगीदार, दानशूर व्यक्तींचे विशेष आभार मानले आहेत कारण त्यांच्या शिवाय हे सामाजिक कार्य पूर्ण होऊ शकले नसते.
Comments