पनवेल :- भाजप नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या कडून १०० कुटुंबाना साठी तांदूळ ,दोन डाळी, तेल, मीठ, साखर , चहा पावडर , अशी शिधासामुग्री महाड येथील पूरग्रस्तांना देण्यात आली . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून ही सामुग्री सदर ठिकाणी पाठविण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महाड व चिपळूण येथे अत्यंत दुर्गम भागात जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने काम करीत आहेत, त्यांचे कार्य हे अतिशय कौतकास्पद आहे म्हणून त्यांच्या मार्फत ही सामुग्री पूरग्रस्तांना पाठविण्यात आली, असे याप्रसंगी बोलताना नितीन जयराम पाटील यांनी सांगितले.