लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कॉरी असोसिएशन च्या शिष्टमंडळाने घेतली तहसिलदारांची भेट...
पनवेल / वार्ताहर : - गेले काही दिवस बंद असलेल्या स्टोन क्रशर कॉरी प्लांट मुळे व्यावसायिकांचे नुकसान होत होते. हा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा म्हणून स्टोन क्रशर कॉरी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, आर. सी. घरत मनसेचे अतुल भगत,मयूर भोईर,उदय ठाकूर,सुनील भोईर, आदी मान्यवरांच्या सह स्टोन क्रशर कॉरी व्यावसायिक उपस्थित होते.
     यानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, मुंबईतून काही उच्च न्यायाधीश येथील जागेची पाहणी करण्याकरता येणार असल्याकारणाने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून स्टोन क्रशर कॉरी व्यावसायिकांनी जवळपास एक आठवडा त्यांचे प्लांट बंद ठेवले होते. अपेक्षित न्यायाधीशांच्या भेटीनंतर सुद्धा हे प्लांट सुरू करण्यात न आल्याने व्यावसायिकांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत होता. त्यांची कैफियत मांडण्यासाठी व्यावसायिकांचे शिष्टमंडळ आज तहसीलदारांना भेटले. योग्य जागेवर योग्य रॉयल्टी भरणाऱ्या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करण्यास हरकत नसल्याचे तहसीलदार तळेकर यांनी सांगितले आहे. तसेच सिडकोच्या भूखंडांवर ज्यांचे प्लांट उभे आहेत त्यांना देखील व्यवसाय करण्यास अनुमती मिळाली आहे. लवकरच आम्ही स्टोन क्रशर प्लांट व्यवसायिक, सिडको अधिकारी आणि प्रशासन यांचे मध्ये संयुक्त बैठक घेऊन व्यावसायिकांच्या समस्या विस्ताराने मांडणार आहोत.
    
 चौकट
साधारण एक वर्षभरापूर्वी सिडको हद्दीतील स्टोन क्रेशर प्लांट व्यावसायिकांना सिडको करवाई चा बडगा दाखवत होती. त्यावेळी आम्ही बैठक घेऊन ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत पुनर्वसनाची जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्लांट बंद करणार नाही. आजही आम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे विनंती करत आहोत की तुम्ही आम्हाला एक बैठक द्या ज्यामध्ये या सगळ्या समस्यांवर साधक-बाधक चर्चा होऊन तोडगा निघेल व व्यावसायिकांना दिलासा मिळेल.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image