पूरग्रस्त भागात भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह २५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे श्रमदान....

पनवेल वैभव  :-  कोकण येथील पूरग्रस्त भागात भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील  यांनी त्यांच्या २५० पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह प्रत्यक्ष पोहोचून श्रमदान केले. 
अनेक ठिकाणी साचलेला गाळ साफ करण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले. यावेळी विक्रांत पाटील यांनी भाजयुमोच्या वतीने सोबत 15 टेम्पो भरून विविध गरजोपयोगी मदत सामग्री नेण्यात आली होती, त्याचे यथा योग्य पद्धतीने वितरण करण्यात आले. महाड , पोलादपूर , चिपळूण,  खेड या भागात त्यांनी भेट देऊन मदत सामग्रीचे वाटप करण्यात आले, यावेळी पूरस्थिती सहायता संयोजक अक्षय नलावडे हे उपस्थित होते.

Comments