पनवेल मध्ये आय.व्ही.एफ सेंटर नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज...

पनवेल / (प्रतिनिधी) भारताची सर्वात मोठी फर्टिलिटी ट्रीटमेण्‍ट्स साखळी असलेल्या इंदिरा आयव्‍हीएफने पनवेलमध्ये आयव्हीएफ सेंटर उपलब्ध करून दिले आहे. पनवेल मधील के मॉल जवळ व रेल्वे स्थानकालगत हे सेंटर नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. 
        उच्‍च यशस्‍वी दर व रूग्‍ण-केंद्रित सेवांसाठी प्रख्‍यात असलेल्‍या या संस्‍थेचे महाराष्‍ट्रातील त्‍यांच्‍या १७ व्‍या, तर भारतातील ९७ व्‍या केंद्राचे उद्घाटन केले आहे. तसेच त्‍यांनी आपल्‍या सेवा मुंबईच्‍या बाहेरील भागांपर्यंत वाढवल्‍या आहेत.                  पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, ठाणे, जळगाव, औरंगाबाद व नांदेड येथे कार्यरत आहेत. येथील सर्व केंद्रांनी १६,३०० जोडप्‍यांना त्‍यांची पालकत्वाची स्‍वप्‍ने साकारण्‍यामध्‍ये मदत केली आहे. इंदिरा आयव्‍हीएफने मागील दशकामध्‍ये ८५ हजारहून अधिक जोडप्‍यांना गर्भधारणेमध्‍ये मदत केली आहे. अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रख्‍यात आणि वैद्यकीय तज्ञ व आयव्‍हीएफ स्‍पेशालिस्‍ट्सद्वारे कार्यसंचालित संस्‍थेने त्‍यांच्‍या प्रक्रियांसाठी अभूतपूर्व यश गाठले आहे. त्‍यांनी इलेक्‍ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टिम्‍स, बंदिस्‍त कार्यरत चेम्‍बर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स, मायक्रोफ्लूइडिक्‍स अशा आधुनिक सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानामध्‍ये गुंतवणूक केली आहे. ज्‍यामधून देशभरातील, तसेच महाराष्‍ट्रातील जोडप्‍यांना सर्वोत्तम उपचार पद्धती उपलब्‍ध असल्‍याची खात्री मिळते. 
याप्रसंगी बोलताना इंदिरा आयव्‍हीएफचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक डॉ. क्षितिज मुर्दिया म्‍हणाले, ''आम्‍हाला पनवेलमध्‍ये आमच्‍या केंद्राचे उद्घाटन करण्‍याचा आणि बाळ असण्‍याची इच्‍छा असलेल्‍या जोडप्‍यांना मदतीचा हात पुढे करण्‍याचा खूप आनंद होत आहे. 

मुंबईसारख्‍या मेट्रो शहरांमध्‍ये अधिकाधिक व्‍यक्‍ती विवाह व कुटुंब नियोजनाला विलंब करत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच अयोग्‍य जीवनशैली पद्धती, प्रदूषण आणि तणावामध्‍ये वाढ या कारणांमुळे अधिकाधिक जोडप्‍यांना नैसर्गिकपणे गर्भधारणा करण्‍यामध्‍ये समस्‍यांचा सामना करावा लागत आहे. आम्‍ही वंध्‍यत्‍वाच्‍या मानसिक व आर्थिक तणावाचे निर्मूलन करण्‍याचा आणि पनवेलमधील अधिकाधिक व्‍यक्‍तींना मदत करण्‍याचा निर्धार केला आहे. महाराष्‍ट्र हे आमच्‍यासाठी महत्त्वाचे राज्‍य आहे आणि आम्‍ही अधिकाधिक ठिकाणी आमचा मदतीचा हात पुढे करण्‍याची आशा व्‍यक्‍त करतो. 
         आयव्‍हीएफ प्रक्रियेबाबत सांगताना इंदिरा आयव्‍हीएफ पनवेल येथील केंद्रप्रमुख डॉ. उदय कारगर म्‍हणाले, ''आयव्‍हीएफ उपचार सुरू करण्‍यापूर्वी जोडप्‍यांचे विविध सोल्‍यूशन्‍स व निष्‍पत्तींबाबत समुपदेशन केले जाते. त्‍यानंतर वंध्यत्‍वाचे कारण समजण्‍यासाठी दोघांची तपासणी केली जाते आणि त्‍यानुसार उपचार पद्धत ठरवली जाते.
Comments