कळंबोली / दीपक घोसाळकर - कळंबोलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने रक्षाबंधना निमित्त कळंबोली कोविड सेंटर येथील कोरोना बाधित रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
जनहिताच्या कामाबरोबरच नागरिकांच्या धार्मिक सणांचे रक्षण करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम कळंबोलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन काळे यांनी केले आहे . त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे समाजातूनही स्वागत करून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.
समाजामध्ये कोरोना महामारी ने मोठे संकट उभे केले आहे .या कोरोना महामारी मध्ये कोरोना बाधित झालेले बांधव व भगिनी हे ह्या पुण्य समजला जाणारा सण साजरा करू शकत नाहीत. याचे महत्त्व लक्षात घेऊन कळंबोलीतील मनसेने कोवीड सेंटरमध्ये दाखल झालेले कोविड ग्रस्त बांधव व भगिनी यांना रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .करोणा चे संकट लक्षात घेता सेंटरमध्ये कोणालाच प्रवेश नसल्याने नितीन काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्षाबंधनाचे पवित्र धागा व त्या बरोबर मिष्ठान्न सेंटरमध्ये देऊन सेंटर मध्येच काम करणाऱ्या भगिनींना व बांधवांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग चे पालन करून साजरा करण्यास आले सांगण्यात आले .त्यानुसार सेंटरमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात साजरा केल्याने सेंटरमध्ये दाखल झालेल्या बंधू-भगिनींचा चेहऱ्यावर आनंद निर्माण झाल्याचे दिसून आले. बाहेरील व्यक्तीला कोविड सेंटर मध्ये प्रवेश नसल्याने तेथील सेवा देत असणारे डॉ. अक्षय कोळेकर त्यांच्या सोबत सेवेकरी नर्स/सिस्टर/मावश्या यांच्या कडे सर्व राख्या व मिठाई सोपवून त्यांच्यां हातून हा पवित्र बंधनाचा उपक्रम पार पाडण्यात आला.
कोविड सेंटर मधील "पुरुष-रुग्णांच्या" चेहऱ्यावरील राखी बांधत असताना आनंद पाहून खूप समाधान या माध्यमातून आढळून आले असून मनसैनिकांना ही जीवनात एक मोठा मानसिक आनंद मिळाल्याचे नितीन काळे यांनी सांगितले आहे.