श्री साईनारायणबाबा आश्रम पनवेलतर्फे पुरग्रस्तांना मदत.....

श्री साईनारायणबाबा आश्रम पनवेलतर्फे पुरग्रस्तांना मदत.....

पनवेल, दि.४ (संजय कदम) ः गेल्या आठवड्यात कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड, खेड, चिपळूण परिसरातील नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यांना मदतीचा हात म्हणून पनवेल येथील श्री साईनारायणबाबा आश्रम पनवेलतर्फे जीवनावश्यक वस्तूंसह औषधांचे वाटप करण्यात आले.
श्री साईनारायणबाबा आश्रम पनवेल व श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या संस्थेचे पदाधिकारी रामलाल चौधरी व राम थदानी तसेच इतर सहकार्‍यांनी मिळून या कोकणातील भागात जावून त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू, औषधे व इतर महत्वाच्या सामानांचे वाटप यावेळी केले आहे. आगामी काळात सुद्धा अशाच प्रकारची मदत येथील बाधितांना करणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. 


फोटो ः श्री साईनारायणबाबा आश्रम पनवेल व श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Comments