चार चाकी वाहने चोरून त्याद्वारे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांस खांदेश्वर पोलिसांनी केले गजाआड
पनवेल दि.१३ (संजय कदम)- पनवेल परिसरातील चार चाकी वाहने चोरून त्याद्वारे घरफोडी करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांस खांदेश्वर पोलिसांनी चोरीच्या चार वाहनांसह ताब्यात घेतले आहे. 
          खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवीन पनवेल से.-13 परिसरातून एका ईको गाडीची चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सदर आरोपींनी ती गाडी महात्मा फुले चौक पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी करण्यासाठी वापरून त्यानंतर कल्याण येथे ती सोडून दिली होती. यासंदर्भात परिमंडळ- 2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहा पोलिस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या आदेशाने खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वपोनि देवीदास सोनावणे व गुन्हे पोलिस निरीक्षक डि.डि. ढाकणे त्याचप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकातील सपोनि प्रविण पांडे, पो. उपनिरीक्षक निलेश पोळ, पोहवा महेश कांबळे, सुदर्शन सारंग, चेतन घोरपडे, पो.ना. नवनाथ लवटे, विशाल घोसाळकर, पोशि सचिन सरघर, चेतन वळवी, संभाजी गाडे आदींचे पथक शोध घेत असताना आरोपी सुनिलसिंग गुलाबसिंग दुधानी (वय-24) व जयकिशन छबीराज गौर (वय-22) या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीत त्यांच्याकडून साडे सहा लाख रूपये किंमतीच्या चार गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दोन्ही आरोपींवर विविध पोलिस ठाण्यांतर्गत सात गुन्हे दाखल आहेत. यांच्या अटकेमुळे वाहनचोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.           
Comments