आमदार प्रसाद लाड यांचा शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे तीव्र निषेध....

पनवेल :- तमाम शिवसैनिकांचे असलेले श्रद्धास्थान "शिवसेना भवन " बाबत भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधाना बाबत शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध व्यक्त करत खांदा कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या पुतळ्याचे केले दहन करून तीव्र संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला.

या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय महामुलकर, संपत सुवर्णा , शहर संघटक संतोष जाधव, उपशहर संघटक संजीव गमरे , प्रकाश वानखडे,शिवसेना महिला शहर संघटीका सानिका मोरे ,उपशहर संघटीका आस्मा खान , विभाग संघटीका स्मिता घाडगे, कार्यालय प्रमुख  संदीप तोरणे ,उपकार्यालय प्रमुख मोतीराम नागम,जेष्ठ शिवसैनिक शिवाजीराव दांगट, माजी शाखा प्रमुख रामदास गोंधळी, शाखाप्रमुख  सुनील औटी , अतुल घुग, मंगेश पवार , उपशाखा प्रमुख जयवंत भायदे, तानाजी यादव , युवा सेना शाखाधिकारी ऋषिकेश घुले, युवा सैनिक युगेश कुरणे उपस्थित होते.
Comments