पनवेल, दि. २६ (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीमध्ये येत असलेल्या दुषित पाण्याबाबत सिडकोच्या संबंधित विभागाकडे जावून तेथील अधिकार्यांना शिवसेनेने जाब विचारला आहे.
जिल्हा प्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व डी एन मिश्रा कळंबोली शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने कळंबोली वसाहतीत सेक्टर 1 मधील अ ब क ड या विभागात सांडपाणी पिण्याचे पाणी लाईन मधून येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्या अनुषंगाने सिडको अधिकारी देवरे पाणी पुरवठा विभाग अधिकारी यांची भेट कळंबोली शिवसेना शहर पदाधिकारी सूर्यकांत म्हसकर आणि अक्षय साळुंखे यांनी स्थानिक रहिवाशांच्या साथीने घेवून याबाबत जाब विचारला तसेच जीवनावश्यक असलेल्या पाणी समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यानुसार देवरे यांनी लवकरच सुरळीत पाणी पुरवठा व स्वच्छ पाणी पुरवठा होईल याकडे लक्ष घालून उपाय योजना करतो असे आश्वासन दिले.
फोटो ः अधिकार्यांशी चर्चा करताना शिवसेना पदाधिकारी सुर्यकांत म्हसकर व इतर