मदतकार्य सुरू असताना नगरसेवक राजू सोनी बालंबाल बचावले, त्यांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांनी मानले आभार


पनवेल:   शहरातील मिडलक्लास सोसायटीमध्ये प्लॉट नं.११८ येथील साईरत्न सोसायटीच्या आवारातील गेल्या अनेक वर्षांचे जुने महाकाय आंब्याचे झाड यावर्षी अतिवृष्टीमुळे सोसायटीच्या पंप हाऊस वर तसेच कम्पाउंड वॉलवर झुकले होते. कोणत्याही क्षणी आंब्याचे झाड रस्त्यावरील वाहनांवर किंवा रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती पाहून सोसायटीचे चेअरमन दीपक केसरिया यांनी सदरची बाब कार्यतत्पर नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिली. नागरी समस्यांसाठी संपर्क साधताच राजू सोनी नेहमीच तातडीने हजर होत असतात. अश्याच प्रकारे राजू सोनी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व नगरपालिकेच्या वृक्षतोड विभागास तसेच अग्निशमन दलाशी संपर्क साधला. परंतु झाड हळूहळू उन्मळू लागल्याने अग्निशमन दलाच्या येण्याची वाट न पाहता त्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याकडे झुकलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू असतानाच अचानकपणे आंब्याचे झाड मुळासकट खाली पडू लागले. त्यावेळी झाडाच्या समोरच राजू सोनी उभे असल्याने त्यांच्या अंगावर झाड पडू लागले, त्यातच रस्ता अरुंद असल्याने सोनी यांना बाजूला जाणे अशक्य होते. परंतु सुदैवाने खाली पडणारे झाड जेसीबीच्या पुढील बाजूस असणाऱ्या भागात अडकले. तरीदेखील झाडाच्या फांद्या राजू सोनी यांच्या अंगावर पडल्याने सोनी यांच्या हाताला, पाठीला किरकोळ मार लागून ईजा झाली. 
         रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ दोन्ही दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल जाधव व जवानांनी रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला.
या घटनेत एका चारचाकी व दुचाकीचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. राजू सोनी यांच्या तत्परतेचे मिडलक्लास सोसायटीतील रहिवाश्यांनी आभार मानले. तसेच मदतकार्यादरम्यान राजू सोनी यांच्यावर महाकाय आंब्याचे झाड पडता पडता वाचल्याने 'काळ आला होता; पण वेळ आली नव्हती' अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. राजू सोनी यांच्या तत्परतेमुळे रस्त्यावर अथवा नागरिकांवर झाड पडून मोठा अनर्थ टळल्याने याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image