पनवेल महानगरपालिकेत स्वातंत्र्यदिन साजरा...पनवेल, दि.१५ : पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल महापलिकेत महापौर डॉ. कविता किशोर चौतमाल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड ,आयुक्त गणेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रायगड सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्यावतीने ध्वजाला मानवंदना देण्यात आली.  यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,  नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, पालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शिक्षण विभागाच्यावतीने  प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर गीत , काव्यवाचन, निबंध स्पर्धांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image