स्मिता हर्डीकर यांच्या ‘दरवळ’ या काव्यसंग्रहाचे दिमाखदार प्रकाशन...

पनवेल :-  ‘दरवळ’ या स्मिता हर्डीकर लिखीत काव्य संग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेत्री सारिका नवाथे यांच्या शुभ हस्ते नेरुळ येथे करण्यात आले.
‘दरवळ’ या काव्य संग्रहास सुप्रसिद्ध लेखिका शैलजा शेवडे यांची प्रस्तावना लाभली असून या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री अश्‍विनी कासार, साहित्य संपदाचे संस्थापक वैभव धनावडे, अमित हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुळच्या बदलापूर येथील पाटणकर यांच्या अध्यात्मिक, धार्मिक वारसा लाभलेल्या घराण्यातील असलेल्या आणि आता नेरुळ येथे वास्तव्यास असलेल्या स्मिता यांना लहानपणापासून लिखाण आणि वाचनाची आवड आहे. 25 ऑगस्ट या स्मिता हर्डीकर यांच्या पतीराजांच्या वाढदिवसादिवशी त्यांनी या काव्य संग्रहाचे प्रकाशन करून त्यांना एक प्रकारे कलात्मक भेट देवून हा काव्य संग्रह त्यांना समर्पित केला. 
डिजीटल पर्व या युट्युब चॅनलवरुन हा प्रकाशन सोहळा ऑनलाईन साजरा करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने नृत्य, गायन व गिटार वादन हे उपक्रम कार्यक्रमाची रंगत वाढविणारे ठरले. या आधीही स्मिता हर्डीकर यांचे अध्यात्मिक विचारांवर आधारीत “वाडीतील तुळस’’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कथा, चारोळ्या, वृत्तबद्ध कविता, गझल, लेख अशी त्यांची लेखन वैशिष्ट्य आहेत.
Comments