पनवेल प्रभाग क्र १८ मधील शेकडो युवकांचा आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश

पनवेल / वार्ताहर :-  रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून व त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन प्रभाग १८ मधील पटेल पार्क येथील प्रसाद चंद्रकांत म्हात्रे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यां सोबत आमदार प्रशांत ठाकूर व भाजपा पनवेल शहर सरचिटणीस - नगरसेवक नितीन जयराम पाटील  यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. 
याप्रसंगी उत्तर युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर , भाजपा पनवेल शहर सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, सोशल मीडिया सेल शहर  सदस्य सचिन नाझरे, प्रभाग क्र १८ चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महेश सरदेसाई उपस्थित होते. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर  व नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments