पनवेल येथील हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य दिन साजरा...पनवेल, दि.१५ : पनवेल महापलिकेच्या हुतात्मा स्मारक उद्यानात स्वातंत्र्य सैनिक बबन धारणे यांच्या पत्नी ताराबाई बबन धारणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हुतात्म्यांचा त्याग कधीही  विसरता येणार नाही. त्यांच्यामुळे नवे काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

याचबरोबर महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. 


सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, तहसिलदार विजय तळेकर, पालिका अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटेनेचे पदधिकारी व सदस्य, नागरिक उपस्थित होते.
Comments