पत्रकार संजय कदम यांच्या कार्याचा गौरव
पनवेल,(प्रतिनिधी) -- 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनीचे औचित्य साधत करंजाडे येथील सिरवी समाज सेवा संस्थाच्या वतीने कोरोना काळात सामाजिक सेवा त्याचबरोबर संकटातही आपलं कुटुंब आणि आपलं आरोग्य धोक्यात घालत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकार, शिक्षक व पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक सामनाचे पत्रकार संजय कदम यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी करंजाडे ग्रा.प.चे सरपंच रामेश्वर आंग्रे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, जेष्ठ नेते कर्णा शेलार, ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे, महामंत्री देवाराम चौधरी अध्यक्ष थानाराम सचीव वोरा राम व प्रमुख कार्यकर्ता कानाराम देदाराम भंवर लाल नगाराम तेजाराम देवाराम नेमाराम देवाराम विनोद सिरवी आदी उपस्थित होते.
पनवेल व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच पनवेल परिसरातील काही खाजगी हॉस्पिटलला देखील कोरोनावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नवी मुंबई, रायगड, उरण आणि पनवेल परिसरातील अनेकजण येथे उपचारासाठी येतात. त्याचबरोबर लॉकडाउनपासून पोलिसांप्रमाणे, पत्रकार व शिक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून परिसरातील नागरिकांना मदत केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील कोरोना काळात चांगले काम केले आहे. यावेळी दैनिक सामनाचे डॅशिंग पत्रकार संजय कदम यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे. तसेच पनवेल वाहतूक शाखेचे महिला पोलीस शिपाई साधना पवार यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले आहे. अश्या कोरोना योद्धाचा सन्मान म्हणून सिरवी समाज सेवा संस्थाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकार संजय कदम यांच्या कार्याचा गौरव
कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दैनिक सामनाचे पत्रकार संजय कदम यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांना मिळालेल्या सन्मानपत्रामुळे त्याचे पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, राजकिय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. कोरोनाच्या आधीही अनेक संकटकाळी त्यांनी नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या कार्याने अनेकदा सामान्यांचे जीवन सावरले आहे. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातही महत्वपूर्ण काम आहे. त्याचे कोरोना काळात केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.