राष्ट्रीयसंस्था माहिरा फाउंडेशनच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नितीन सोमण व महिला जिल्हाध्यक्षपदी रिमा रावल यांची नियुक्ती...
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या पनवेलसह, नवी मुंबई, महाराष्ट्र व दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अनेकांचे विवाह करून देणार्‍या माहिरा फाऊंडेशनच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नितीन सोमण व जिल्हा महिला अध्यक्षपदी रिमा रावल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
माहिरा फाऊंडेशनचा रायगड जिल्हा पद वाटप कार्यक्रम आज स्पाईसवाडी मध्ये संपन्न झाला. यावेळी नितिन सोमण यांना रायगड जिल्हा अध्यक्ष पद जाहीर झाले व सौ रिमा रावल यांना रायगड जिल्हा महिला अध्यक्ष पद देण्यात आले. याप्रसंगी माहिरा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश पांडे, संचालक धर्मेंद्र उपाध्याय, गोविंद सर, आणि राहुल उपाध्याय उपस्थित होते. माहिरा फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देताना दिनेश पांडे यांनी सांगितले की, आम्ही गोरगरीबांसाठी कार्यरत असतो. आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून रुग्णवाहिका घेणार असून त्याची जास्तीत जास्त सेवा गरजवंत रुग्णांना देणार आहोत. या कार्यक्रमाला रजनी सिन्हा, रेखा भगत, अनिता पाटील, सुनीता डोलेकर, चित्रा देशमुख, यमुना प्रकाशन, चांदणी आदी उपस्थित होते व त्यांनी नितिन सोमण आणि सौ रिमा रावल यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिमा रावल यांनी केले.
फोटो ः नियुक्ती.
Comments