संघटनेच्या दातृत्वाने शिक्षकांचे डोळे पाणावले....

संघटनेच्या दातृत्वाने शिक्षकांचे डोळे पाणावले....

कळंबोली ( दीपक घोसाळकर) : प्रलयकारी निसर्ग प्रकोपाने महाड मधील सर्वच बेचीराख झाले. पुराच्या भक्ष्यस्थानी महाड व परिसरातील शाळाही पडल्या. पुराच्या पाण्याने बेचीराख झालेल्या खाजगी प्राथमिक शाळांना सहकार्याचा हात देण्यासाठी रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर शाळा संघटना सरसावली आहे .नुकतीच पूरामध्ये सर्वस्व गमावून बसलेल्या शाळांना व  कर्मचाऱ्यांना संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य व शैक्षणिक साहित्याचे मदतीचा हात देण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी व शाळातील शिक्षकही पूरते भारावून गेले अन् अचानकपणे नकळत सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्‍या.
           नुकत्याच झालेल्या प्रलयकारी निसर्ग प्रकोपाने महाडला पुराचा वेढा पडला. यामध्ये नागरिकांचे संसार पुराच्या पाण्याने बेचीराख झाले .पुराच्या तडाख्यात महाड , खरीवली , पोलादपूर मधील शाळाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या .सर्वांकडून मदतीचा ओघ येत होता .मात्र शाळांमधील कर्मचारी व शाळांना आवश्यक असणारे साधन सामुग्री देण्याचा मनोदय रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने हाती घेतला. यामध्ये पूर्णपणे उध्वस्त झालेल्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे मदत सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली मराठी शाळेतील शिक्षक बांधवांनी मदतीचा हात देऊन खारीचा वाटा उचलला आहे. संघटनेच्या वतीने पूरग्रस्त शिक्षक बांधवांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंच्या किटचे वाटप महाड येथे जाऊन संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्दमंड उर्दू प्राथमिक शाळा , वा.गो.गाडगीळ प्राथमिक शाळा,संस्कार धाम मराठी प्राथमिक शाळा खरवली,श्री प्रभावती रा . शेठ प्राथमिक शाळा पोलादपूर ,श्रीमती गे.ब.जैन मराठी प्राथमिक शाळा लाडवली, अ.ना.कोटीभास्कर प्राथमिक शाळा बिरवाडी  या पूरग्रस्त शाळेत जाऊन करण्यात आले. यावेळी शिक्षक बांधवांना अन्नधान्य वस्तूचे कीट व शालेय वस्तूंची शैक्षणिक वस्तू देत असताना अत्यंत भावनिक क्षण निर्माण झाल्याने पूरग्रस्त शिक्षक व मदतीचा हात देणाऱ्या संघटनेच्या शिक्षक सदस्यांचे ही डोळे नकळत पाणावले गेले. शिक्षक संघटनेने देऊ केलेल्या शैक्षणिक व अन्नधान्य साहित्यामुळे शिक्षक सदस्य पुरते भारावून गेले. यावेळी संघटनेच्या वतीने महाड पोलादपूर बिरवाडी, खरी वली येथील शाळांना भेटी देऊन शाळांच्या पूरग्रस्त स्थितीचा आढावा घेऊन पाहणी करण्यात आली. 
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम, उपाध्यक्ष मीनाक्षी कर्वे ,उपाध्यक्ष सुधाकर जैवळ, सरचिटणीस यशवंत मोकल, सचिन सावंत,सुगिद्र म्हात्रे, रीनेश गावित,देवेंद्र केळुस्कर, संजय पाटील, दत्तात्रेय पगार,विकास मांढरे,दीपक सूर्यवशी ,पिराजी पालवे , प्रमोदिनी पाटील,अरुण जोशी , राजेश्री शेवाळे हे शिक्षक बांधव उपस्थित होते.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image