भाजयुमो तर्फे भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा....
पनवेल :-  भारताच्या स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव भारतीय जनता युवा मोर्चा ने संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला.
या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.तेजस्वी सुर्या यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरामध्ये 75 किलोमीटर मॅरेथॉन अथवा सायकल रॅली अश्या युवा संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 62 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये सायकल रॅली संपन्न झाली.प्रत्येक जिल्ह्यात साडेसात किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे नवी मुंबई येथे सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. 
याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे,प्रभारी प्रशांत कदम व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments