मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात साजरा....

पनवेल / वार्ताहर :- सालाबादप्रमाणे या वर्षी ही स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्या कारणाने या कार्यक्रमाला वेगळे महत्व आले.
अरुणाचल प्रदेश इथे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस सेवेत कार्यरत असतांना शहीद झालेले वीर सुनील यशवंत हिरे यांचे बंधु श्री विजय यशवंत हिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १५ वर्षांखालील मुलां-मुलींसाठी खास भारतमाता आणि स्वातंत्र सैनिक या विषयावर वेशभूषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या वेशभूषा स्पर्धेला बच्चे कंपनीने भरगोस प्रीतिसाद देत कार्यक्रमाची आणखीन शोभा वाढवली.या वेशभूषा स्पर्धेच्या परीक्षणाचे काम लिटल किंडर स्कुल च्या संस्थापक व प्रिंसिपल सौ प्रज्ञा ठक्कर यांनी केलं.

अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील,सत्यवान पाटील सर, देविदास खेडकर, तानाजी खंडागळे, प्रदीप देशमुख, उदय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image