सुकापूर ते नेरे रस्त्याची दुरावस्था, रस्त्यात खड्डेच खड्डे.....

पनवेल दि.15 (वार्ताहर): सुकापूर- भगतवाडी ते नेरे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणे धोकयाचे झाले आहे. हे खड्डे बुज़वून रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

            सुकापूर- भगतवाडी आणि विहीघर ते कोप्रोली येथे रस्त्याला भरपूर खड्डे पडलेले आहेत. कदाचित यंदा पाऊस जरा जास्त प्रमाणात झाला असावा म्हणून ही शक्यता नाकारता येत नाही. येथील रस्ताच वाहुन गेला असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार रिक्षाचालक, एसटी व इतर वाहनांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या १० सप्टेबर रोजी गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. श्री गणरायांचे आगमन घरोघरी होणार आहे. आता पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली आहे. तरी गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची डागडुजी करून घ्यावी आणि दिवाळीनंतर रस्ता नवीन बनवावा अशी मागणी ग्रामस्थांसह विविध राजकीय पक्षांनी केली आहे. 

          फोटोः रस्त्याला पडलेले खड्डे
Comments