९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव पनवेल येथे कृषी विभागामार्फत साजरा...

पनवेल  :-  तालुका कृषी अधिकारी पनवेल यांच्यामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मुंबई गोवा हायवे कल्हे बस थांबा येथे आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले,
आदिवासी गटातील बचत गटातील महिलांनी आळू, तेरी, करंटोली, टाकला, कवळा, गाबोळी, दिंडा, भारंगी, कुडा, आलव, सुरन इ. रानभाजी महोत्सवात विक्रीसाठी आणली होती व ग्राहकांचा योग्य प्रतिसाद मिळाला.रानभाज्या विक्री करणाऱ्या महिलां बचतगटासाठी तालुका कृषी अधिकारी पनवेल यांच्याकडून आत्मा अंतर्गत विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत छत्रीचे व टोपल्यांचे वाटप करण्यात आले.

जि.प. सदस्य श्री.ज्ञानेश्वर घरत यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आदिवासी बांधव व इतर शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जागा व आठवडा बाजार उपलब्ध करून देण्याची शासनाकडे मागणी केली. व आदिवासी विकास प्रकल्प, पेन येथून आदिवासी बांधवांना विक्री व्यवस्थेसाठी 20 हजार रुपये अनुदान मिळावे याची मागणी करण्यात आली. ता कृ अ पनवेल श्री ईश्वर चौधरी यांनी प्रस्तावित केले की, निसर्ग निर्मित रानभाज्यांची मानवी जीवनातील महत्त्व अधिक आहे तरी युवा पिढीच्या मनावर हे बिंबवले पाहिजे, या रानभाज्या चे सेवन केल्याने अधिक पोषण मूल्ये व नैसर्गिक गुणधर्म व निरोगी आरोग्यासाठी जीवनात उपयुक्त असल्याचे त्यांनी व्यक्त केले,तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आदिवासी बांधव व इतर शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जागा व आठवडा बाजार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे मागणी प्रस्ताव पाठविला आहे असे आश्वासित केले. 
 रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्य श्री ज्ञानेश्वर घरत, पंचायत समिती पनवेल सदस्य सौ.मनीषा मोरे, आपटा ग्रा.सदस्य सौ.मनीषा वाघे, युसुफ मेहेराली सेंटर,तारा येथील सामाजिक कार्यकर्ते सौ.अंजू पवार व श्री सावंत उपस्थित होते, तालुका कृषी अधिकारी श्री ईश्वर चौधरी पंचायत समिती पनवेल येथील कृषी अधिकारी मुकेश कांबळे व प्रकाश म्हात्रे, मंडळ कृषी अधिकारी पाचपुते, कृषी पर्यवेक्षक दोलतोडे, कृषी सहाय्यक मनीषा वळसे, धनश्री लाड, प्रिती बोराडे, श्री प्रसाद पाटील, व्ही एच पाटील, दिनेश ढाळपे, कृषी मित्र लक्ष्‍मण पाटील, रामभाऊ पाटील, ज्ञानेश्वर मोरे, रत्नाकर घरत, आदिवासी महिला गट प्रवर्तक सौ कल्पना पवार, समृद्धी महिला बचत गट, जागृती महिला बचत गट, आनंदी महिला बचत गट इ. सर्व आदिवासी गटातील सदस्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला..
Comments