पनवेल / वार्ताहर :- गव्हाण ग्रामपंचायत ही नेहमीच आदर्शवत लोकोपयोगी उपक्रम राबवत असते. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना मोफत कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज गव्हाण येथे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते व कामगार नेते मा. श्री. महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत लसीकरण उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, जेष्ठ नेते रघुनाथशेठ घरत, उपसरपंच अरुण कोळी, मा. उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.