मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने वडाळे तलाव रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक....
पनवेल / वार्ताहर :- नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या वडाळे तलावाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.नवीन पनवेल कडून जुन्या पनवेल आणि अमरधामच्या कडे जाणारा हा रस्ता सुस्थितीत असल्याने वाहन चालक व बाईक स्वार वेगाने गाड्या चालवत असल्याची बाब काही सतर्क नागरिकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.या रस्त्यावर दुर्घटना होण्याची संभावना लक्षात घेऊन विक्रांत पाटील यांनी त्वरीत महापालिका अधिकाऱ्यांशी बोलून या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक लावण्यास सांगितले व त्यासंबंधी पत्र दिले. 
महापालिकेने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कारवाही करत या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक लावून घेतले.नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे नगरसेवक विक्रांत पाटील यांना नागरिकांनी धन्यवाद दिले.
Comments