सिडकोकडून सेवा हस्तांतरीत करण्याविषयी आयुक्तांनी घेतली बैठकपनवेल,दि.23 : सिडकोकडून विविध सेवा पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्याच्या पार्श्वभूमीवर आज(23 ऑगस्ट) आयुक्त गणेश देशमुख यांनी उपायुक्त व संबधित विभाग अधिकारी यांची बैठक आयुक्तांनी घेतली.

यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, शहर अभियंता संजय जगताप,मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, अग्निशमन विभाग प्रमुख अनिल जाधव, अधिकारी उपस्थित होते.

सध्या सिडको विभागातील घनकचऱ्याची सेवा महापालिका पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी  या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार आहेत. याबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिडकोकडून सेवा हस्तांतरीत केल्यावरती त्यांच्या देखभालीचा अंदाजित खर्च, त्याची देखभाल करण्याकरिता लागणारे मनुष्यबळ, प्रत्येक नोडमध्ये सिडकोने पुर्ण केलेली कामे तसेच अपूर्ण कामे यांचा सविस्तर आढावा घेऊन या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image