आ.प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलच्या व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद....
पनवेल, दि.१४ (वार्ताहर) ः पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा या आ.प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलमधील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यातील एक प्रतिष्ठीत व्यापारी चंद्रकांत रिखबदास चोरडीया यांनी त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी नवीन कोरे असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस व गाऊन मदत म्हणून दिली आहे.
शहरातील व्यापारी चंद्रकांत चोरडीया यांचा व्यापार कमी प्रमाणात आहे. तसेच गेल्या 2 वर्षापासून झालेल्या लॉकडाऊनचा फटका त्यांना सुद्धा बसला आहे. व्यवसाय अर्ध्यावर आला आहे. परंतु कोकणातील बांधवांवर कोसळलेले संकट हे आपल्यावर कोसळलेले संकट आहे व त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी खिशाला चाट देवून नवीन कोरे वेगवेगळ्या प्रकारचे 100 ड्रेस व माता भगिनींसाठी 50 गाऊन आणून ती मदत पुरग्रस्तांसाठी केली आहे. यावेळी प्रभाग 19 चे नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका रुतुजा लोंढे आदींच्या उपस्थितीत ही भरघोस मदत त्यांनी केली आहे. या मदतीचे आ.प्रशांत ठाकूर यांनी मनापासून कौतुक करून अशीच गोरगरीबांसाठी मदत सर्वांनी करावी, असे आवाहन सुद्धा केले आहे.


फोटो ः पुरग्रस्तांसाठी कपड्यांची मदत करताना व्यापारी चंद्रकांत चोरडीया यांच्यासोबत नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर व इतर मान्यवर.
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image