गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या चोरटयाचा पोलिसांकडून शोध सुरु ....


पनवेल दि.२६ (वार्ताहर) : तळोजा फेज-1 मध्ये भारत गॅसच्या सिलेंडरची डिलिव्हरी देण्यासाठी नेण्यात आलेल्या टेम्पोतील दोन भरलेल्या गॅसचे सिलेंडर दोघा चोरट्यानी चोरुन नेल्याचे उघडकिस आले आहे. तळोजा पोलिसांनी या चोरटया विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

तळोजा येथील क्रिस्ट भारत गॅस सर्व्हीस या दुकानात डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला असलेल्या बिभीषण जैन हा सोमवारी सकाळी दुकानातून गॅसने भरलेले 40 सिलींडर घरोघरी डिलीव्हरी करण्यासाठी घेतले होते. त्यानंतर बिभीषण हा टेम्पोतून सदर सिलेंडर घेऊन तळोजा फेज-1 मध्ये डिलीव्हरी देण्यासाठी गेला होता. यावेळी बिभीषण हा तळोजा सेक्टर-9 मधील देवा आशिष बिल्डींगमध्ये 3 सिलेंडर देण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने आपला टेम्पो सदर बिल्डींगच्या समोरील रस्त्यावर उभा केला होता. यावेळी त्याठिकाणी स्कुटीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी टेम्पोमधून 2 गॅसने भरलेल्या सिलेंडरची चोरी करुन पलायन केले.  
काही वेळानंतर बिभीषण आपल्या टेम्पोजवळ आला असता, त्याला टेम्पोमध्ये सिलेंडर कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याने सिलेंडरची मोजणी केली असता, त्यात दोन सिलेंडर गायब असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे बिभीषण याने त्याठिकाणी आपल्या सहकाऱयांना बोलावून घेऊन समोरील इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्याठिकाणी स्कुटीवरुन आलेल्या दोघा चोरटयानी टेम्पोतून दोन भरलेले सिलेंडर चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने तळोजा पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गॅस सिलेंडरची चोरी करणाऱया दोघांचा शोध सुरु केला आहे.
Comments