ग्रुप ग्रामपंचायत पारगाव येथे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशानुसार करण्यात आले लसीकरण..
पनवेल / वार्ताहर :- ग्रुप ग्रामपंचायत पारगाव येथे कोव्हीशिल्ड या लसीचे माननीय निधी चौधरी  जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार लसीकरण करण्यात आले.
यावेळी प्रथमच 100 लस देण्यात आल्या,  सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, ग्रामपंचायत पारगाव यांनी मा. जिल्हाधिकारी यांचे जास्त लस साठा दिल्याने आभार मानले आहेत. 
या लसीकरण प्रसंगी ग्रामपंचायत पारगाव  सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, उपसरपंच अंजली राहुल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य मनोज दळवी, सुशीलकांत तारेकर , सुनंदा नाईक, शिल्पा नाईक, निशा पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील, बाळाराम पाटील, रत्नदीप पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद म्हात्रे, चंद्रभागा तारेकर व संतोष देवळे, तसेच सदस्य निशा रत्नदीप पाटील, विजय वाघे , विश्वनाथ पाटील, बानुबाई बाबुराव म्हात्रे, सोनाली भोईर, कल्पना तारेकर , डॉक्टर भारती आदी उपस्थित होते.
Comments