नगरसेवक नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन
पनवेल / वार्ताहर : - 
पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा भाजप शहर सरचिटणीस नितीन पाटील यांचा वाढदिवस रविवारी (दि. 29) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरातील गोखले सभागृहात मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या सामाजिक कार्याचा गौरव केला.

जाणिव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले नितीन पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे अनेक सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. आपल्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक पाटील यांच्या वतीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील गोखले सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 250 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
या उपक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, माजी नगरसेवक डी. आर. भोईर, नीता माळी, वॉर्ड अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला मोर्चाच्या लीना पाटील, प्रसाद हनुमंते, उमेश इनामदार, प्रितम म्हात्रे, श्रुती मराठे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी नगरसेवक नितीन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक नितीन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामाजिक जाणिवेतून नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचे कौतुक केले तसेच सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू ठेवत जनसेवा करीत राहा, असे सांगितले. त्यांनी या वेळी कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्याचाही गौरव केला.
Comments