पनवेल / वार्ताहर :- पनवेल शहरातील नागरिकांना मालमत्ता करतील ५% सवलत मुदत आता ३१ जुलै वरून ३० ऑगस्ट करण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या मालमत्ता कराचा विषय खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे.परंतु सिडको व्यतिरिक्त जुन्या नगरपालिका क्षेत्रातील मूळ पनवेल शहरातील नागरिकांना नेहमीप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स च्या बिलांचे वाटप करण्यात आले. ऑगस्टच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात नागरिकांकडे प्रोपर्टी टॅक्स ची बिले पोहोचल्यावर त्यामध्ये पाच टक्के सूट दर्शवण्यात आली परंतु ही सवलत ३१ जुलैपूर्वी कर भरणाऱ्यांसाठी होती. मूलतः टॅक्सची बिल हीच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात लोकांना प्राप्त झाल्यावर ही पाच टक्के सवलत नागरिकांना कशी मिळणार असा प्रश्न तयार झाला कोविड मुळे २०२०-२०२१ व आताची २१-२२ अशी एकूण रक्कम या बिलांमध्ये दिली गेली असल्याने रक्कमही मोठी होती. अशा परिस्थितीत पाच टक्के मिळणारी सवलत ही सामान्य माणसासाठी अत्यंत आवश्यक व गरजेचे होती अनेक नागरिकांनी बिलेज उशिरा मिळाल्याबाबत शिवसेनेकडे तक्रार केल्यानंतर शिवसेनेचे महानगर संघटक व मा. नगरसेवक ऍड प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली व नागरिकांच्या तक्रारी सांगून ही मुदत वाढवावी अशी आग्रहपूर्वक मांडणी केली. तसे निवेदनही दिले.
शिवसेनेच्या मागणीला ताबडतोब सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त गणेश देशमुख यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सांगून ही मुदत ३० ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मूळ पनवेल शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरताना पाच टक्के मिळणारी सवलत ही आता ३० ऑगस्टपर्यंत मिळणार असून त्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान वाचणार आहे. शिवसेनेच्या या त्वरित प्रयत्नानंतर पनवेलमधील नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. यावेळी प्रथमेश सोमण यांचे सोबत उप महानगर संघटक सुनीत ठक्कर शहर , संघटक प्रवीण जाधव, महिला शहर संघटिका अर्चना कुलकर्णी व शाखाप्रमुख प्रसाद सोनवणे, युवासेनेचे कौस्तुभ सोमण उपस्थित होते.