धाकटा खांदा गाव परिसरातील सर्व्हिस रोडची कामे तातडीने करण्याची शिवसेनेची सिडकोकडे मागणी

पनवेल दि. २३ (वार्ताहर)- धाकटा खांदा गाव परिसरातील सर्व्हिस रोडची कामे तातडीने सिडकोने करून द्यावी अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्य अभियंता अधिक्षक मोहिले यांची भेट घेऊन केली आहे.
          यावेळी शिवसेना पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, शाखाप्रमुख भास्कर पाटील, मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे, मुकुंद पाटील, सुकाजी भगत, मनोहर पां. म्हात्रे, नंदकुमार पां. म्हात्रे, संतोष म्हात्रे, परशुराम म्हात्रे, दिनकर म्हात्रे, नरेश म्हात्रे आदी उपस्थित होते. धाकटा खांदा हे गाव सिडको हद्दीत मोडतो. गावाच्या पश्चिम बाजूकडून जेएनपिटी ते कळंबोली हा महामार्ग जातो व तेथे महामार्गावर ब्रीज आहे व बाजूने सर्व्हिस रोड आहे. याच बाजूला खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे या बाजूकडून रोज हजारो नोकरदार वर्ग स्टेशनकडे जात असतात. परंतु येथे कायमस्वरूपी रस्ता नसल्याने नागरिकांना पावसाळ्या फार त्रास सहन करावा लागतो. तसेच दुचाकी व चारचाकी वाहने गावापर्यंत येऊ शकत नाहित. तरी सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गावाची पाहणी करून गाव ते सर्व्हिस रोडपर्यंत रस्ता करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीची दखल सिडकोचे अधिकारी मोहिले व मुलाणी यांनी घेऊन लवकरात लवकर रस्ता करण्याचे आश्वासन दिले आहे.
          
Comments