महिलेची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ घेऊन चोरटे पसार....


पनवेल दि.01 (वार्ताहर)- पोलीस असल्याचे सांगून कामोठे येथे 60 वर्षीय महिलेची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
कामोठे, सेक्टर 35 येथील अरुणा मसुरकर ह्या देव दर्शनासाठी पायी चालत चालल्या होत्या. या वेळी एक इसम पोलीस आहे असे सांगून त्यांच्याजवळ आला व कालच या ठिकाणी चाकुचा धाक दाखवून शिक्षिका महिलेचे सोन्याचे दागिने काढून नेल्याचे त्याने सांगितले. यावेळी तुम्ही तुमचे दागिन घालून फिरू नका नाहीतर तुमचे सोने देखील घेऊन जातील असे सांगून तुमच्या अंगावर घातलेले सोने काढून ते तुमच्या पिशवीत घालून ठेवा असे त्या इसमाने सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून अरुणा यांनी त्यांचे दागिने काढले व त्यांच्या पिशवीत ठेवले. यावेळी त्या इसमाने पिशयीची गाठ मारून देतो असे सांगितले व 20 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ घेऊन तो निघून गेला. त्याचा पाठलाग केला असता हे दोन्ही अनोळखी इसम फसवणूक करून चैन घेऊन निघून गेले. कामोठे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Comments